नांव : गोविंद हरि दंडवते
जन्मदिनांक व वास्तव्य : ८/१२/१९३१. कसबे तडवळे, जि.धाराशिव, ४१३४०७
राहणार : नीरा- नरसिंहपूर, ता. इंदापूर,जि.पुणे
व्यवसाय : शेती,
शिक्षण – साहित्याचार्य ( म.सा. प.पुणे ) (१९६२)
साहित्य- निबंध : अर्वाचीन व अगदी अर्वाचीन कवींच्या काव्यातील विषय व त्यासंबंधीचा त्यांचा दृष्टीकोण यांतील समान व विरोधी प्रवाह (१९५६)
स्थलवर्णन : श्रीक्षेत्र नीरा- नरसिंहपूर (१९७२ ) ( १९८४ ) ( १९९६ )
संशोधन : व्दे विरुपेसुक्तभाष्यम् ( १९६८ )
संपादन : उपासना ( पुर्वार्ध ) (१९८५), उपासना उत्तरार्ध (१९८७) चरणसेवा (१९९४), आराधना (१९९४)
संशोधकीय प्रयोगिक निबंध : Theoretical Experimental and Practical Study of Vajralep in respect of Idols of Deities (1982-1992)
लेखमाला :
- पडलेले किल्ले आणि विसरलेला इतिहास (१९८७)
- शिवछत्रपतींचे जीवीतकार्य (१९९२)
मिळालेली पारितोषिके :
- श्रीशंकराजी नारायण पारितोषिक( १९५६ )
- महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे ( १९७५ )
- अनंत भालेराव स्मृतिपत्रकारिता पुरस्कार ( १९९३ )
पत्रकारिता :
प्रामुख्याने ऐतिहासिक विषयावरील शंभरापेक्षा अधिक लेख सोलापूर तरुण भारतमधून प्रसिध्द, त्या पत्राचे अधिकृत वार्ताहर.
सिद्ध साहित्य :
- देणे ईश्वराचे ( कादंबरीमय संतचरित्र )( १९८६ )
- सर्वव्यापी नीरानृसिंह ( शोधनिबंध ) ( १९९३)
- श्रीनृसिंहस्तोत्र
वाङ्मय संपादन :
- वंदना,
- अर्चना,
- सन्निधि,
- चरणारविंदी,
- पराशक्ती,
- कृपामयी,
- अभयकारी,
- सकलसुखदायी ( १९९२ )
विशेष नोंदी : कोश वाङ्मयात समाविष्ट लेख –
- श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर ( १९६५ ),प्राचीन भारतीय स्थलकोश, पुणे. संपादक : सिध्देश्वरशास्त्री चित्राय.
- श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर (१९९२),मराठी विश्वकोश, वाई. संपादक – लक्ष्मणशास्त्री जोशी.
- मराठी सारस्वत,पुणे या विद्दमान मराठी लेखकांच्या कोशात प्रस्तुत लेखकाचा समावेश ( १९८७ )
संकल्पित साहित्य :
- अयोध्याकांड,
- औरंगजेबाचे अखेरचे दिवस
- धाराशिव जल्ह्याच्या इतिहासाची साधने.
वै. गोविंद हरि दंडवते यांची श्री लक्ष्मी नृसिंह उपासनेसाठी उपयुक्त पुस्तके
- श्रीमदिव्यलक्ष्मीनृसिंहपूजा
- श्रीलक्ष्मीनृसिंह पूजा व कथा
- अथश्रीनृसिंहसहस्त्रनामावलि:
- श्रीलक्ष्मीनृसिंहआराधना (दुर्मिळ नृसिंह स्तोत्रांचा संग्रह)
- अथश्रीनृसिंहसहस्त्रनामावलि: (पॉकेटसाईज)
- श्री क्षेत्र नीरा-नरसिंहपूर नित्य उपासना
- श्री नृसिंहकवचम् व इतर स्तोत्रे
- श्री नृसिंह भजनावली