नीरा-नृसिंहपूर क्षेत्रात मुख्य देवालयाखेरीज खालील अन्य देवतास्थाने आहेत.

पावकनृसिंह :
गावाच्यां पश्चिमेस हे छोटेसे मंदिर असून आत नृसिंहाची चतुर्भुज मुर्ती आहे. मस्तकी मुकुट आहे. पेशवेकाळात एकदा या क्षेत्रावर पेंढारी परचक्र आले असताना या स्थानावरुन भुंग्यांचे थवे च्या थवे निर्माण झाले व त्यांनी हे परचक्र पिटाळून लाविले अशी आख्या्यिका आहे. या प्रसंगाच्या स्ममरणार्थ हे मंदिर उभारुन त्यात नृसिंहमुर्ती स्थापिली गेल्याचे दिसते.

श्रीहनुमान :
हे स्थान भीमेच्या बाजूस असुन श्रींचे दगडी देवालय बांधलेले आहे. बाजूस मोकळे आवार आहे. शके 1858 साली एक ग्रामस्थ् गोविंद नरहर सुरु यांनी मुद्दाम करविलेली हनुमानाची मूर्ती या मंदिरात नव्याने स्थापिली आहे.

श्रीएकवीराई :
श्री हनुमानाचे मागील बाजुस जमिनीच्या आत बांधलेले हे देऊळ असून आत या देवीचा तांदळा आहे. ही रेणुकादेवी म्हणजे भगवान परशुरामाची माता होय.

श्रीहनुमान :
गावाच्या पश्चिमेस या हनुमानाचे देऊळ आहे. नजिक काही समाधी आहेत या सर्व सत्पुरुषांनी या क्षेत्री तपश्चर्या केल्या असाव्यात व त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग या क्षेत्री केला असावा. त्यापैकी एक समाधी निंबाळकरांची आहे.

श्रीशिरसाई:
आदिशक्तीचे हे स्थान तुळजापूरचे आहे. छोटयाशा देवळात देवी आहे. शिरसूफळ येथील हे स्थान आहे असेही म्हाणतात.

श्रीभैरवनाथ:
नीरेच्या पैलतीरावर हे स्था‍न असून मध्यमसा गाभारा, पुढे सभामंडप असे दगडी बांधणीचे देऊळ आहे. क्षेत्रपाल जोगेश्वरी यांच्या मुर्ती गाभार्यारत आहेत. शिवाय नीरानदीच्या पात्रात एक भग्न देऊळ असुन त्यास जलभैरवनाथ असे म्हणतात.

स्वामी समाधी
वैष्णव संप्रदायातील कोणा अधिकारी स्वामींनी या क्षेत्री समाधी घेतली, त्यांची समाधी गावाच्या पश्चिमेस शके 1778 मध्ये वामन दंडवते यांनी बांधली. पूर्ण मंदिराच्या परिसरात आणखी पाच लहानशा समाध्या आहेत.

पद्मगिरीबुवांचा मठ :
नाथपंथाचाही प्रसार या क्षेत्री झालेला दिसतो. या पंथातील कोणी पद्मगिरीबुवा यांचा मठ भीमेच्या काठावर आहे. या मठात वीर मारुतीची मुर्ती स्थापित आहे.


एकंदरीत विचार करता या क्षेत्री श्रीनृसिंहाची अकरा स्थाने, शंकराची बारा स्थाने, गणपतीची एकवीस स्थाने, शक्तीची सहा स्थाने, मारुतीची अकरा स्थाने व गरुडाची पाच स्थाने आहेत.


नृसिंहाची एकादश स्थाने

(1) प्रल्हादकृतनृसिंह (2) ब्रम्हादेवकृतनृसिंह (3) स्तंभनृसिंह (4) भीमाशंकरानजीचा स्तंभनृसिंह (5) गावाच्या पश्चिमेस पावकनृसिंह (6) दशावतार मुर्तीतील नृसिंह (7) आद्यनृसिंह (8) नृसिंहतीर्थावरील नृसिंह (9) तरटीनृसिंह (10) सोळखांबावरील अश्वस्थ नृसिंह (11) भीमातीरावरील भीमानृसिंह


शंकराची व्दादशस्थाने

(1) भीमाशंकर (2) काशीविश्वेश्वीर (3) रामेश्वर (4) देवालयातील चिंतामणीतील शिवलिंग (5) सोळखांबावरील शिवलिंग (6) कवडे घाटावरील शिवलिंग (7) संगमकाठच्या चिंतामणीतील शिवलिंग (8) माणकेश्वर घाटावरील शिवलिंग (9) दुर्गातीर्थावरील शिवलिंग (10) सभामंडपातील विंचूरकर पुतळयानजीकची शंकरमूर्ती (11) सभामंडपातील शिवपंचायतनातील शंकर मूर्ती (12) श्रीजानकेश्वर


गणपतींची एकवीस स्थाने

(1) देवालयातील मुहुर्त गणपती (2) प्रल्हाद मंदिराच्या पाठभिंतीतील गणपती (3) काशीविश्वेश्वर गाभार्याततील गणपती (4) काशीविश्वेश्वराच्या नंदीजवळचा गणपती (5) दक्षिणकडील ओवर्याहतील गणपती (6) कवडे घाटावरी बुरुजातील गणपती (7) माणकेश्वर घाटावरील मुहूर्त गणपती (8) लक्ष्मी घाटावरील बुरुजातील गणपती (9) सोळखांबावरील गणपती (10) संगमकाठावरील चिंतामणीतील गणपती (11) गणेशतीर्थावरील गणपती (12) दक्षिण उन्मुखावरील गणपती (13) देवालयाच्या पितळी दरवाज्यावरील गणपती (14) गर्भागारावरील गणपती (15) मूळ गाभार्याडवरील गणपती (16) देवालयातील चिंतामणीतील गणपती (17) विंचूरकर पुतळयानजीकचा गणपती (18) शिवपंचायतनातील गणपती (19) लक्ष्मी मंदिरावरील गणपती (20) प्रल्हाद मंदिरावरील गणपती (21) उत्तर उन्मु‍खावरील गणपती


आदिशक्तीची सहा स्थाने

(1) देवालयातील श्रीलक्ष्मी (2) घाटावरील महालक्ष्मी (3) देवालयातील शाकंभरी (4) शिरसाई (5) एकवीराई (6) दुर्गातीर्थावरील शिवराई


मारुतीची अकरा स्थाने

(1) शामराज मुर्तीनजीकचा मारुती (2) प्रल्हाद मंदिरातील मारुती (3) सोळखांबावरील मारुती (4) सुरुस्थापित मारुती (5) नागघाटावरील मारुती (6) लक्ष्मीघाट बुरुजावरील मारुती (7) देवस्थान मळयावरील मारुती (8) कवडे घाटावरील मारुती (9) नृसिंह तीर्थावरील मारुती (10) दक्षिणेकडीलओवर्यांततील मारुती (11) तीर्थकुंडाजवळील मारुती.


गरुडाची पाच स्थाने

(1) प्रल्हाद मंदिरातील गरुड (2) दशावतारातील गरुड (3) विंचूरकर अर्पित गरुडमुर्ती (4) दक्षिण ओवर्याुतील गरुड (5) शामराजाच्या पाठभिंतीतील गरुड